
चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणतात…
चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे. ‘संसद भवनाच्या कार्यालयातून आम्हाला या संदर्भातील ई-मेल आला आहे. हा खऱ्या अर्थानं मोठा सन्मान आहे, असं ते म्हणाले. तीन दिवसांच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात सहभागी होणार का असं विचारलं असता त्यांनी असमर्थता दर्शवली. ‘तातडीनं दिल्लीला जाणं जरा अवघड आहे, पण मी उद्या कदाचित तिकडं जाण्यासाठी निघेन. उपराष्ट्रपती देखील चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत असं मला कळलंय, असं शर्मा यांनी सांगितलं.








