
मोठ्या वीकेंडमुळे या आठवड्यात चार मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये रजनीकांतचा ‘जेलर’, अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’, चिरंजीवीचा ‘भोला शंकर’ आणि सनी देओलचा ‘गदर २’ यांचा समावेश आहे. चार बड्या सुपरस्टारच्या चित्रपटांपैकी ‘गदर २’ने असा डंका वाजवला आहे की, सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या चित्रपटाची पहिल्या दिवसाच्या आगाऊ बुकिंगसाठी तब्बल तीन लाख तिकिटे विकली गेली होती. ‘गदर २’ने पहिल्या दिवशी ४० कोटी आणि दुसऱ्या दिवशी ४३ कोटी कमावले. ८३ कोटींच्या कमाईसह सनी देओलचा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून आता काहीच पावले दूर आहे. रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन मिळवून हा चित्रपट १०० कोटींच्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.







