France PM Gabriel Attal | गॅब्रिएल अटल बनले जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान, फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून स्वीकारणार पदभार! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
France PM Gabriel Attal | गॅब्रिएल अटल बनले जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान, फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून स्वीकारणार पदभार! | Navarashtra (नवराष्ट्र)


गॅब्रिएल अटल बनले जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान, फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून स्वीकारणार पदभार!

गॅब्रिएल अटल यांची फ्रान्सच्या नवीन पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी नवीन पंतप्रधानांच्या नियुक्तीची घोषणा केली. गॅब्रिएल अटल हे जगातील पहिले समलिंगी राष्ट्रप्रमुख आहेत.

फ्रान्सच्या इतिहासात एक मोठी घटना घडली आहे. गॅब्रिएल अटल (Gabriel Attal) नावाच्या तरुणाने वयाच्या 34 व्या वर्षी थेट फ्रान्सत्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान पटकावला आहे. फ्रेंच सरकारमध्ये शिक्षणमंत्री म्हणून काम केलेले गॅब्रिएल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. महत्त्वाचं म्हणजे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ओळख मिळवणारे गॅब्रिएल अटल हे पहिले समलैंगिक पंतप्रधानही आहेत. सोमवारी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी फ्रान्सच्या निवर्तमान पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांचा राजीनामा स्वीकारला. एलिझाबेथ यांच्या जागी मॅक्रॉन यांनी शिक्षणमंत्री गॅब्रिएल यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती (France newly appointed PM Gabriel Attal) केली.

हे सुद्धा वाचा

 34 वर्षांचे आहेत Gabriel

फ्रान्सचे नवनियुक्त पंतप्रधान गॅब्रिएल अटल 34 वर्षांचे आहे. मॅक्रॉनचे माजी राजकीय सल्लागार स्टीफन सेजॉर्न यांच्याशी अटलचे संबंध आहेत. गॅब्रिएल अटल 17 वर्षांचे असताना त्यांनी सोशलिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला. साथीच्या आजाराच्या वेळी गॅब्रिएलला यांना सरकारी प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. यानंतर ते 2023 मध्ये अर्थ मंत्रालयात कनिष्ठ मंत्री आणि शिक्षण मंत्री झाले.






Source link