फलटण : ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती तालुक्यातील निंबुत ग्रामपंचायत आयोजित ध्वजारोहणाचा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून १९६३ च्या देशातील पहिल्या सर्व महिला सदस्या असलेले निंबुत ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या तसेच जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या आदर्श माता व वाचनप्रेमी आजी म्हणून सर्वांना परिचित असणारे बबई बनसोडे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते . ध्वजारोहण करण्यासाठी निंबूत येथील सर्व आजी माजी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य , मराठी शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .
बबई बनसोडे यांचे वय ८४ वर्षे असून त्या चष्मा विना पुस्तके आणि वर्तमान पत्र आजही वाचतात यांचे शिक्षण ७वी पर्यत झाले आहे . बबई बनसोडे आजी मोठया आनंदाने सांगतात की महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलीची शाळा सुरू केल्याने मला शाळेची पायरी चढता आली आणि लिहिता वाचता यायला लागले त्यापुढे असे सांगतात की त्यांचे चुलते लक्ष्मण जगताप हे महात्मा फुले , छत्रपती शाहू महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होते त्यामुळे समाजातील मुलीने शिक्षण घेतले पाहिजे अशी विचारधारा असल्याने त्यांनी बबई यांना शाळेत दाखल केले त्यावेळी संपूर्ण कांबळेश्वर भागात शाळेत फक्त तीनच मुली होत्या . शाळा ७वी पर्यंत असल्याने , ७वी नंतर पुढील शिक्षण त्यांना घेता आले नाही . शिकण्याची इच्छा असून ही जवळ शाळा नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागले शिक्षण थांबल्यामुळे त्यांचे लग्न करण्यात आले
लग्नानंतर निंबूत येथे आल्यानंतर त्यांचे पती केरबा बनसोडे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याची तळमळ असल्याने त्यांच्या सर्व वेळ हा राजकारण व समाजकारणात जात असे, त्यामुळे घराकडे आणि कुटुंबाकडे व शेती कडे व्यवस्थित लक्ष देता येत नव्हते, तेव्हा शेती व कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आल्याने पुस्तकांची वाचनाची आवड मागे पडत गेली, आणि शेती कुटुंब मुला मुलीच्या शिक्षणाची या जबाबदार त्यांनी मोठ्या जिद्दीने पार पडला सुरुवातीच्या काळात त्यांना मोलमजुरीची कामे सुद्धा करावी लागली होती . निंबुत गावचे काकडे परिवार व त्यांच्या मिळालेल्या पाठिंबामुळे केरबा बनसोडे यांना सोमेश्वर कारखान्याची संचालक पद मिळाले होते, राजकीय सामाजिक वारसा असल्याकारणाने त्या काळी कोणतीही आरक्षण नसताना 1963 मध्ये देशातले पहिले सर्व महिला सदस्य असलेले निंबुत ग्रामपंचायतीच्या बबई बनसोडे या सदस्य झाल्या होत्या
ध्वजारोहणाच्या कार्यक्रम संपल्यानंतर बबई बनसोडे यांनी उपस्थितीच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारल्या व आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती होते