
अक्षय लक्ष्मण गवते जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमधील फायर अँड फ्युरी कॉर्प्समध्ये सहभागी होते. त्यांच्या
भारतीय लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
लडाखमधील सियाचीन येथील उंच बर्फाळ पर्वतांच्या रणांगणात देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. सियाचीन ग्लेशियरच्या धोकादायक भागात कर्तव्य बजावताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण (first Agniveer Akshay Laxman Gawate) आलं. भारतीय लष्कराने रविवारी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
हे सुद्धा वाचा
भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने शोकाकुल कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. भारतीय लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, या दुःखाच्या प्रसंगी ते शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.









