Monday, September 14, 2026
Homeसातारा"फलटण-कोरेगावमध्ये बौद्ध समाजाच्या आमदारासाठी ठाम निर्धार! 90 नामनिर्देशन अर्ज, कडेकोट बंदोबस्तात दाखल"

“फलटण-कोरेगावमध्ये बौद्ध समाजाच्या आमदारासाठी ठाम निर्धार! 90 नामनिर्देशन अर्ज, कडेकोट बंदोबस्तात दाखल”

फलटण :-  फलटण कोरेगाव (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात 90 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले असून, एकूण 59 उमेदवारांनी निवडणुकीत आपला सहभाग नोंदवला आहे, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 26 अर्ज दाखल झाले. तहसील कार्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दिगंबर आगवणे आणि त्यांची पत्नी सौ. जयश्री आगवणे यांनी अर्ज दाखल केले. वंचित बहुजन आघाडीचे सचिन भिसे आणि भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत कोरेगावकर यांनीही अर्ज दाखल केला आहे. विद्यमान आमदार दिपक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अर्ज दाखल केला असून, महायुतीतून सचिन  कांबळे पाटील यांनी अजित पवार गटाच्या वतीने अर्ज भरला आहे.

बौद्ध समाजाने “एकच निर्धार…बौद्ध आमदार” अशी घोषणा देत संवाद अभियान राबवले होते. त्यांनी खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना भेटून प्रतिनिधित्वाची मागणी केली होती. मात्र, कोणत्याही पक्षाने उमेदवारी न दिल्याने संविधान समर्थन समितीने अपक्ष म्हणून नंदु मोरे, बुवासाहेब हुंबरे, गंगाराम रणदिवे, प्रा. रमेश आढाव यांच्या अर्ज दाखल केले आहेत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज छाननी: 30 ऑक्टोबर

अर्ज माघार: 4 नोव्हेंबर

मतदान: 20 नोव्हेंबर

मतमोजणी: 23 नोव्हेंबर

मतदारसंघात एकूण 338464 मतदार असून, त्यापैकी 172459 पुरुष, 165991 महिला आणि 14 अन्य मतदार आहेत. एकूण 355 मतदान केंद्रांपैकी 47 शहरी आणि 308 ग्रामीण मतदान केंद्रे आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments