Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशFake Loan Apps | गुगलची मोठी कारवाई; फेक लोन ऍप्स गुगल प्ले...

Fake Loan Apps | गुगलची मोठी कारवाई; फेक लोन ऍप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटवले | Navarashtra (नवराष्ट्र)

Fake Loan Apps | गुगलची मोठी कारवाई; फेक लोन ऍप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटवले | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

गुगलची मोठी कारवाई; फेक लोन ऍप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटवले

आजकाल काही मिनिटांमध्येच लोन उपलब्ध करुन देणारे कित्येक अॅप्स प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत. यांपैकी बरेच ऍप्स तर जास्त डॉक्युमेंट्सही मागत नाहीत. त्यामुळे लोक गरजेच्या वेळी अशा ऍप्सची मदत घेतात.

नवी दिल्ली : आजकाल काही मिनिटांमध्येच लोन उपलब्ध करुन देणारे कित्येक अॅप्स प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत. यांपैकी बरेच ऍप्स तर जास्त डॉक्युमेंट्सही मागत नाहीत. त्यामुळे लोक गरजेच्या वेळी अशा ऍप्सची मदत घेतात. मात्र, यांपैकी बऱ्याच ऍप्सचे कर्मचारी त्यानंतर ग्राहकांना मानसिक त्रास, धमक्या द्यायला सुरू करतात.

काही प्रकरणांमध्ये ग्राहकांची आर्थिक फसवणूक देखील होते. अशाच फेक लोन अॅप्सवर गुगलने मोठी कारवाई केली आहे. यूजर्सच्या सुरक्षिततेसाठी गुगलने प्ले स्टोअरवर असणारे तब्बल 2,200 फेक लोन अॅप्स डिलीट केले आहेत. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुगलने एप्रिल 2021 ते जुलै 2022 या कालावधीत 3,500 ते 4,000 लोन अॅप्सची पडताळणी केली. यानंतर सुमारे 2,500 अॅप्स डिलीट केले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments