Fadnavis in Telangana: ‘तेलंगणात केवळ एकाच कुटुंबाचे भले’: देवेंद्र फडणवीस यांचा प्रचारसभांचा धडाका

0
15
Fadnavis in Telangana: ‘तेलंगणात केवळ एकाच कुटुंबाचे भले’: देवेंद्र फडणवीस यांचा प्रचारसभांचा धडाका


चार राज्यात फडणवीस यांचा प्रचार सभांचा धडाका

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ दिवस विविध राज्यात प्रचार केला. १८ सप्टेंबर आणि १० तसेच १५ नोव्हेंबर या दरम्यान फडणवीस यांनी मध्यप्रदेशात धार, इंदूर, महू, बुरहानपूर, पांढुर्णा, सौंसर या ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. ३० ऑक्टोबर रोजी छत्तीसगडच्या दौर्‍यावर असताना धमतरी, रायपूर येथे रोड शो आणि प्रचारसभा घेतल्या. १४ सप्टेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या दौर्‍यावर असताना फडणवीस यांनी केसरी, नासिराबाद, किशनगड, अजमेर उत्तर, सांगानेर, आदर्शनगर येथे एकूण ७ सभा घेतल्या होत्या. तेलंगणात त्यांनी २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी डोमलगौडा, हैदराबाद येथे रोड शो घेतले तसेच नरसामपेट, देवलकोंडा, पालाकुर्ती येथे सभा आणि रोडशो केले आहे.



Source link