Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रExplainer : अहमदनगर जिल्ह्यात भाजप नेते कॉंग्रेसच्या जयश्री थोरात यांनाच का टार्गेट...

Explainer : अहमदनगर जिल्ह्यात भाजप नेते कॉंग्रेसच्या जयश्री थोरात यांनाच का टार्गेट करत आहे? कोण आहेत जयश्री थोरात?

Explainer : अहमदनगर जिल्ह्यात भाजप नेते कॉंग्रेसच्या जयश्री थोरात यांनाच का टार्गेट करत आहे? कोण आहेत जयश्री थोरात?

[ad_1]

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज्यात सर्वात जास्त सहकारी संस्थांचं जाळं या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात लोकसभेच्या शिर्डी आणि अहमदनगर अशा दोन जागा आणि विधानसभेच्या १२ जागा आहेत. नगर जिल्ह्याचं राजकारण अनेक गटा-तटात विभागलेलं असून जिल्ह्याच्या राजकारणावर प्रामुख्याने विखे-पाटील कुटुंबाची गेली अनेक दशकं घट्ट पकड आहे. मात्र वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघावर अनेक राजकीय घराण्यांचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं. यात संगमनेर तालुक्यात थोरात, कोपरगाव तालुक्यात काळे, नेवासे तालुक्यात गडाख, राहुरी तालुक्यात तनपुरे तर श्रीगोंदा तालुक्यात पाचपुते कुटुंबीयांनी वर्चस्व राखलेलं आहे. अहमदनगर जिल्हा हा बारामतीला लागूनच असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचाही या जिल्ह्याच्या राजकारणात वेळोवेळी हस्तक्षेप राहिलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यात १९ साखर कारखाने असून या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक दूधाचं उत्पादन होतं. प्रामुख्याने दूध सहकारी संघ, सहकारी साखर कारखाने आणि शिक्षण संस्थांच्या अफाट जाळ्याच्या माध्यमातून येथील राजकारण चालत असतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments