ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी फलटणमध्ये एल्गार; १ सप्टेंबरला ‘रास्ता रोको’

0
28
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी फलटणमध्ये एल्गार; १ सप्टेंबरला ‘रास्ता रोको’

फलटण –मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीदरम्यान ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ नये, या भूमिकेसह फलटण तालुक्यात ओबीसी संघर्ष समितीने एल्गार पुकारला आहे. समितीने येत्या सोमवारी, दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नाना पाटील चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

संत सावतामाळी मंदिरात पार पडलेल्या बैठकीत समितीने स्पष्ट केले की, “आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमचा ठाम विरोध आहे.” यावेळी जातनिहाय जनगणना करून मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

बैठकीत बापूराव शिंदे, भीमदेव बुरुंगले, डॉ. बाळासाहेब शेंडे, गोविंद भुजबळ, अमिरभाई शेख, शिवसेना तालुका प्रमुख पिंटू इवरे, संदीप नेवसे, मिलिंद नेवसे, दादासाहेब चोरमले, अजय माळवे, प्रा. बाळासाहेब घनवट यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

“ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असताना आम्ही शांत बसणार नाही. शासनाने कोणाच्याही मागणीसाठी ओबीसी समाजाचा बळी देऊ नये,” असा खणखणीत इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.