
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीची लढाई निवडणूक आयोगात पोहचल्यानंतर आता अजित पवार गटाने आपल्याकडेच आमदारांची संख्या सर्वाधिक असल्याचा दावा करीत. शरद पवार आपल्या मर्जीनेच पक्ष चालवित असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर आपले घर चालवल्याप्रमाणे ते पक्ष चालवित होते, असा घणाघाती आरोपदेखील त्यांनी केला.
Sharad Pawar Vs Ajit Pawar : पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव असल्याचे सांगत एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही, राष्ट्रवादीमध्ये (NCP) हेच सुरू होते, असा आरोप अजित पवार (Ajit Pawar) गटाने केला. शरद पवार हे (Sharad Pawar) घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते. पक्षात लोकशाहीचा अभाव होता असा मोठा दावा अजित पवार गटाने केला आहे. तसेच आमदारांची संख्या आपल्याकडे मोठी आहे, त्यामुळे पक्ष आमचाच आहे असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर आज पुन्हा सुनावणी सुरू असून अजित पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येत आहे.
शरद पवार यांच्याकडून सिंघवी करणार युक्तीवाद








