EC hearing on NCP Symbol | राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाची? कोणाकडे जाणार पक्षाचे चिन्ह आणि नाव, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड, शरद पवार स्वतः सुनावणीला हजर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
EC hearing on NCP Symbol | राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाची? कोणाकडे जाणार पक्षाचे चिन्ह आणि नाव, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड, शरद पवार स्वतः सुनावणीला हजर | Navarashtra (नवराष्ट्र)


राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाची? कोणाकडे जाणार पक्षाचे चिन्ह आणि नाव, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड, शरद पवार स्वतः सुनावणीला हजर

EC hearing on NCP Symbol : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीला स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हजर आहेत. त्यामुळे या सुनावणीचे महत्त्व आणखी जास्त वाढले आहे. या सुनावणीत निवडणूक आयोग काही मोठा निर्णय जाहीर करते का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? या संबंधित याचिकेवर आज सुनावणी पार पडत आहे. या सुनाणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: सुनावणीसाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झाले आहेत. त्यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड सुनावणीसाठी हजर आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हेदेखील निवडणूक आयोगात दाखल आहेत.

दोन्ही गटांकडून एकूण 18 ते 20 जण हजर






Source link