Earthquake in Nepal | नेपाळमध्ये मध्यरात्री मोठा भूकंप, आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू; भारतातही जाणवले जोरदार धक्के | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
Earthquake in Nepal | नेपाळमध्ये मध्यरात्री मोठा भूकंप, आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू; भारतातही जाणवले जोरदार धक्के | Navarashtra (नवराष्ट्र)


भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये मध्यरात्री भूकंपाची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घनेत आत्तापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.

भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये मध्यरात्री भूकंपाची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घनेत आत्तापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली असून या भूंकपाच्या धक्क्याने राजधानी दिल्लीतील एनसीआरला हादरा दिला आहे. उत्तर भारताच्या काही भागांतही या भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती आहे. जखमींची संख्याही मोठी असल्याचे समजते.

सध्या बचावकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नेपाळच्या उत्तरी-पश्चिम जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. रुकूम पश्चिम जिल्ह्यात ३६ आणि जाजरकोट येथे २० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.






Source link