Dunki Advance Booking: परदेशांत डंका वाजला! भारतात कधी सुरू होणार ‘डंकी’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग?

0
18
Dunki Advance Booking: परदेशांत डंका वाजला! भारतात कधी सुरू होणार ‘डंकी’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग?


Dunki Advance Booking In India: बॉलिवूड किंग शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष अतिशय खास गेलं आहे. या वर्षात रिलीज झालेले त्याचे दोन्ही चित्रपट तुफान गाजले आहेत. या वर्षाची धमाकेदार सुरुवात शाहरुख खान याच्या ‘पठान’ या चित्रपटाने झाली होती. तर, त्यानंतर आलेल्या ‘जवान’ चित्रपटानेही चांगली कामगिरी केली. आता या वर्षाचा शेवटही गोड करण्यासाठी शाहरुख खान पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. शाहरुख खान याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहे. नुकतेच ‘डंकी’ चित्रपटाचे काही टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, आता प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. एकीकडे परदेशांमध्ये या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे अ‍ॅडव्हान्स बुकिंग भारतात कधी सुरू होणार, असा सवाल चाहते करत आहेत.



Source link