जोशी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव पुरस्कार’ प्रदान

0
10
जोशी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव पुरस्कार’ प्रदान

जोशी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव पुरस्कार’ प्रदान

जोशी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव पुरस्कार’ प्रदान
फलटण : येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित ‘जोशी हॉस्पिटल प्रा. लि.’ च्या रौप्यमहोत्सवी (२५ वर्षे) वर्षपूर्तीनिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘उषा-वैभव पुरस्कार’ सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रसाद जोशी यांना ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना उषा मंगेशकर यांनी डॉ. जोशी यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “हॉस्पिटलमध्ये केवळ रुग्णांची संख्या वाढणे महत्त्वाचे नसून, आलेला प्रत्येक रुग्ण बरा होणे अधिक महत्त्वाचे आहे.” तसेच त्यांनी डॉ. प्रसाद जोशी यांनी पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये येऊन सल्ला द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
उषाताईंनी यावेळी फलटणला यापूर्वी दिलेल्या भेटींची आठवण करून देत पुन्हा एकदा येथे येण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
या भव्य सोहळ्यास विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रल्हाद साळुंखे-पाटील, उद्योगपती दिलीपसिंह भोसले, पत्रकार रवींद्र बेडकिहाळ आणि स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाच्या संस्थापिका मधुबाला भोसले यांचीदेखील उपस्थिती लक्षणीय ठरली.
कार्यक्रमात जोशी हॉस्पिटलच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देत समाजात विश्वास निर्माण करणाऱ्या या संस्थेचा गौरव करत उपस्थितांनी डॉ. जोशी यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.