
त्यानुसार लष्कराचे पथक, जम्मू काश्मीर पोलिस व इतर सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहीम राबवली. यानंतर जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तब्बल २० मिनिटे चाललेल्या या चकमकीत एका अधिकाऱ्यासह चार जवान गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता चारही जवानांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डोडामध्ये अजूनही दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. येथे तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.







