
मिळालेल्या माहितीनुसार,बसमध्ये (जेके ०२ सीएन-६५५५) ५६ लोक प्रवास करत होते.हीबस किश्तवाडमधून जम्मूकडे जात होती. बटोत-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावर त्रुंगल-अस्सारजवळ बस अनियंत्रित होऊन ३०० फूट खोल दरीत कोसळली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार या मार्गावर तीन बसेस एकत्र जात होत्या. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.






