
आमदारांच्या मागणीनंतर एसआयटी गठीत केली जाणार असून मृत्यूच्या साडेतीन वर्षानंतर चौकशीला सुरुवात होणार आहे. दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभेत चांगलाच गाजला होता. भाजप आमदार नितेश राणे आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी यांची सरकारकडे चौकशीची मागणी केली होती. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आरोप केला होता की, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू (AU) नावावरून ४४ वेळा फोन आला होता. राहुल शेवाळे यांनी असाही दावा केला होता की बिहार पोलिसांच्या मते एयूचा अर्थ आदित्य आणि उद्धव ठाकरे असा आहे. तेव्हापासून AU नक्की कोण आहे, याच्या तपासाची जोरदार मागणी केली जाऊ लागली. दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणेंनी केली होती.



