Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशराहुल गांधींनी घातला AM-PMचा गोंधळ, PMपद कसे सांभाळणार? प्रणव मुखर्जींच्या पुस्तकात भन्नाट...

राहुल गांधींनी घातला AM-PMचा गोंधळ, PMपद कसे सांभाळणार? प्रणव मुखर्जींच्या पुस्तकात भन्नाट किस्से

राहुल गांधींनी घातला AM-PMचा गोंधळ, PMपद कसे सांभाळणार? प्रणव मुखर्जींच्या पुस्तकात भन्नाट किस्से

[ad_1]

माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिवंगत प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेल्या दैनंदिनीवर आधारित त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेले In Pranab, My Father : A Daughter Remembers हे इंग्रजी पुस्तक प्रकाशनापूर्वीच चांगले चर्चेला आलंय. यूपीए सरकारच्या काळात संकटमोचक म्हणून मानले जाणारे प्रणव मुखर्जी आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यादरम्यान कसे तणावपूर्ण संबंध होते, राहुल गांधीविषयी प्रणव मुखर्जी खासगीत काय बोलायचे तसेच गांधी कुटुंबीय मुखर्जींकडे नेहमीच संशयाने पाहत असल्याने पंतप्रधानपदाने त्यांना सतत हुलकावणी दिली, याचे भन्नाट किस्से या पुस्तकात देण्यात आले आहेत. २००४-२०१४ दरम्यान डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधानपदी असताना प्रणव मुखर्जी हे सरकारमधले ज्येष्ठ सर्वाधिक अनुभव असलेले ज्येष्ठ मंत्री होते. सरकारच्या अनेक कमिट्यांचं अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. परंतु प्रणव मुखर्जी यांचा डोळा पंतप्रधानपदाकडे होता आणि ते पद न मिळाल्यामुळे त्यांना वाईट वाटायचं, असं या पुस्तकातील घटनांमधून दिसून येतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments