Dia Mirza Birthday: वडिलांचे नाव फ्रँक हैंड्रिच पण दिया लावते ‘मिर्झा’ आडनाव, काय आहे प्रकरण?

0
17
Dia Mirza Birthday: वडिलांचे नाव फ्रँक हैंड्रिच पण दिया लावते ‘मिर्झा’ आडनाव, काय आहे प्रकरण?


दियाचा जन्म ९ डिसेंबर १९८१ साली हैदराबाद येथे झाला. तिचा आज ४२वा वाढदिवस आहे. दियाने करिअरच्या सुरुवातील मॉडलिंग केले. त्यानंतर तिला एका चित्रपटाची ऑफर आली. या पहिल्यावहिल्या चित्रपटातूनच दिया रातोरात स्टार झाली. तिने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा हा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दियासोबत अभिनेता आर माधवन, बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आजही या चित्रपटातील काही डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतात.



Source link