Dhirendra Shastri : बागेश्वर बाबा म्हणतात, मुली मागे लागल्यात, जीव द्यायची धमकी देतात! आता लग्न करणार

0
16
Dhirendra Shastri : बागेश्वर बाबा म्हणतात, मुली मागे लागल्यात, जीव द्यायची धमकी देतात! आता लग्न करणार


Dhirendra Krishna Shastri marriage : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेल्या बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. या बाबत त्यांनी स्वत: पत्रकारांना माहिती दिली. त्यांना एका पत्रकाराने तुम्ही लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी यावर उत्तर दिले. धीरेंद्र कृष्ण शास्त्री हसून म्हणाले की लग्नाची चर्चा ऐकून मी आता खूप वैतागलो आहे. मी लवकरच लग्न करण्याचं ठरवलं असून आईला सून शोधण्यास सांगितले असल्याचे त्यांनी उत्तर देतांना सांगितले.



Source link