
देवोलीना भट्टाचार्जीची पोस्ट झाली व्हायरल
अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने पुढे लिहिले की, ‘तो एक उत्कृष्ट डान्सर होता, पीएचडी करत होता. कामातून मोकळा होऊन तो इव्हनिंग वॉकसाठी बाहेर पडला होता आणि चालत असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळी झाडली. अमेरिकेतील काही मित्र त्याचा मृतदेह भारतात घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अद्याप त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भारतीय दूतावासाने यात आमची मदत करावी. निदान त्याच्या हत्येचे कारण तरी कळायला हवे.’ आता अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले आहे.







