
राजीनाम्याबाबत भुजबळ म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर न बोलण्यास सांगितले होते. “मी यावर मौन बाळगले, पण ओबीसींच्या बाजूने बोलल्याबद्दल भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा असे काही लोक म्हणत आहेत. मी मी शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसींसाठी लढणार असेही भुजबळ म्हणाले.






