
अभिनेते देव आनंद यांचे खरे नाव धर्मदेव पिशोरीमल आनंद. त्यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी पंजाबमधील गुरुदासपुरच्या एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्यांनी लाहोरमधील प्रसिद्ध महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात पदवी शिक्षण पूर्ण केले होते. अभ्यास हुशार असलेल्या देव आनंद यांनी आणखी खूप शिकायचे होते. मात्र, त्यांच्या सामान्य कुटुंबासाठी हे परवडणारे नव्हते. पुढे शिकायचं तर, स्वतःचे पैसे कामाव आणि शिक, अशी तंबी देखील त्यांना घरून मिळाली होती.







