
कविता तायडे (वय ३९) असं अपघाती मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ती मूळची शेगावची रहिवासी आहे. बुधवारी संध्याकाळी पती हरीदास तायडे याच्यासोबत कविता तायडे ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीत भिक्षा मागत होती. शिवडीला गाडी थांबल्यावर ते दोघेही डबा बदलण्यासाठी उतरले. हरिदास तायडे हे दुसऱ्या डब्यात चढले, पण त्याचवेळी घाई-गडबडीत कविताचा पाय घसरला आणि ती दोन डब्यांच्या मधल्या फटीतून रुळावर पडली. प्लॅटफॉर्मवर असलेले लोक तिला मदत करण्याच्या आधीच गाडी सुरू झाली आणि ती गाडीखाली चिरडली गेली. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.










