DC vs RR : राजस्थानला चौथा धक्का; रविचंद्रन अश्विन बाद | पुढारी

0
14
DC vs RR : राजस्थानला चौथा धक्का; रविचंद्रन अश्विन बाद | पुढारी


पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 चा नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होत आहे. सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही तर, दिल्लीने इशांत शर्मा आणि होप यांच्या जागी मुकेश कुमार आणि ॲनरिक नॉर्टजे यांना संघात स्थान दिले आहे. (DC vs RR)

राजस्थानला चौथा धक्का; रविचंद्रन अश्विन बाद

सामन्याच्या 14 व्या षटकात दिल्लीचा गोलंदाज अक्षरने ट्रिस्टन स्टब्सकरवी अश्विनला बाद केले. अश्लिनने आपल्या खेळीत 19 बॉलमध्ये 29 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 षटकार लगावले.

राजस्थानला तिसरा धक्का; जोस बटलर बाद

जोस बटलरच्या रूपाने राजस्थानला तिसरा धक्का बसला. त्याला कुलदीप यादवने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला या सामन्यात केवळ 11 धावा करता आल्या.

संजू सॅमसनच्या रूपात राजस्थानला दुसरा झटका

सामन्याच्या 6 षटकात संजू सॅमसनच्या रूपात दुसरा फलंदाज बाद झाला. त्याला दिल्लीचा गोलंदाज खलील अहमदने विकेटकीपर पंतकरवी झेलबाद केले. संजूने आपल्या खेळीत 14 बॉलमध्ये 15 धावा केल्या. यामध्ये त्याने 3 चौकार लगावले.

राजस्थानला पहिला झटका; यशस्वी बाद

राजस्थान रॉयल्सची पहिली विकेट दुसऱ्याच षटकात पडली. मुकेश कुमारने नऊ धावांवर यशस्वी जैस्वालला बाद केले.

संघ :

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

दिल्ली कॅपिटल्स इम्पॅक्ट प्लेयर : अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशगरा, रसिक दार.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान.

राजस्थान रॉयल्स इम्पॅक्ट प्लेयर : रोविमन पोयल, आंद्रे बर्गर, तनुष खाटियान, शुभम दुबे, कुलदीप सेन.

हेही वाचा :





Source link