Tuesday, September 15, 2026
Homeक्रीडाDavid Johnson Death : भारतीय क्रिकेटवर शोककळा! चौथ्या मजल्यावरून पडून माजी क्रिकेटपटूचा...

David Johnson Death : भारतीय क्रिकेटवर शोककळा! चौथ्या मजल्यावरून पडून माजी क्रिकेटपटूचा मृत्यू

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड ज्युड जॉन्सन यांचा गुरुवारी (दि. 20) त्यांच्या बेंगळुरू येथील अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ते 52 वर्षांचे होते. मानसिक स्थिती ठीक नसल्याने जॉन्सन यांनी जीवन संपवल्याची चर्चा आहे. कोट्टनूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

जॉन्सन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

16 ऑक्टोबर 1971 रोजी जन्मलेल्या डेव्हिड जॉन्सन यांनी यांनी भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले. त्यांनी ऑक्टोबर 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जवागल श्रीनाथ जखमी झाल्यामुळे त्यांना त्या सामन्यात संधी मिळाली. या कालावधीत उजव्या हाताचे वेगवान गोलंदाजी करणा-या जॉन्सन यांनी 47.66 च्या सरासरीने 3 बळी घेतले. त्यांना भारताकडून एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

 











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments