Dalip Tahil Birthday: कामासाठी दारोदारी वणवण फिरले; वयाच्या ४८व्या वर्षी अखेर नशीब पालटले! वाचा दलिप ताहिलबद्दल..

0
15
Dalip Tahil Birthday: कामासाठी दारोदारी वणवण फिरले; वयाच्या ४८व्या वर्षी अखेर नशीब पालटले! वाचा दलिप ताहिलबद्दल..


दलिप ताहिल यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९५२ रोजी आग्रा, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव घनश्याम ताहिल रमाणी हे भारतीय हवाई दलात कार्यरत होते. त्यांच्या सततच्या बदलीमुळे दलिप यांचे बालपणही वेगवेगळ्या ठिकाणी गेले. वयाच्या १०व्या वर्षी त्यांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात दलिप ताहिल यांनी नाटकांमध्ये इतकं उत्कृष्ट काम केलं की, त्यांना खूप वाहवा मिळवली. वडील निवृत्त होऊन मुंबईत नोकरीला लागल्यानंतर संपूर्ण कुटुंब तिथेच स्थायिक झाले. दलिप यांनी मुंबईतील एका थिएटरमध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचे बारकावे शिकून घेतले. ते थिएटर करत असताना प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांची नजर त्यांच्यावर पडली. १९७४मध्ये दलिप यांचा ‘अंकुर’ हा पहिला चित्रपट आला. त्यात दलिप यांची मोठी भूमिका होती. मात्र, आयत्यावेळी ती भूमिका कापण्यात आली होती.



Source link