Dada Kondke: दादा कोंडके यांच्या चित्रपटात झळकलेली बैलजोडीही होती खास! सतीश शहांनी सांगितला ‘तो’ किस्सा

0
12
Dada Kondke: दादा कोंडके यांच्या चित्रपटात झळकलेली बैलजोडीही होती खास! सतीश शहांनी सांगितला ‘तो’ किस्सा


सतीश शहा यांनी दादांमधील माणुसकीला सलाम करत या बैलजोडीची आठवण सांगितली आहे. ते म्हणाले की, ‘दादा जेव्हा ‘आगे की सोच’ या चित्रपटाची तयारी करत होते, तेव्हा मला त्यांच्याकडून या चित्रपटातील भूमिकेची ऑफर आली. दादांच्या चित्रपटात काम करायला मिळणार याचा मला खूप आनंद झाला होता. पुण्याजवळील त्यांच्या इंगळी या गावातील फार्महाउस परिसरात या चित्रपटाचं शूटिंग झालं. दादांची एक गोष्ट मला फार आवडायची. ते त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर पोटच्या मुलासारखं प्रेम करायचे. मग, ते शेतातील घर असो, किंवा तेथील वस्तू… हा परिसर त्यांनी खूप छान ठेवला होता. शूटिंग दरम्यान गावातील एक शेतकरी काही अडचणीमुळे त्याच्या बैलजोडीला कत्तलखान्यात घेउन चालला होता. दादांना ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी ती बैलजोडी आपल्या ताब्यात घेतली. ते बैल त्यांनी शेतातील घरी आणले आणि म्हणाले की, आता ही बैलजोडी इथेच राहिल. मी त्यांचा सांभाळ करेन. मरणाच्या वाटेवरून बैलजोडीला जीवनदान देणाऱ्या दादांनी आयुष्यभर ती बैलजोडी आपल्या पोटच्या मुलांसारखी जपली. दादांच्या अनेक चित्रपटात ती बैलजोडी झळकली. या बैलजोडीसाठी दादा स्वतः काही प्रसंग तयार करायचे आणि ते चित्रपटात दाखवायचे. दादांनी कधीच त्यांच्या या दातृत्वाचा ढोल वाजवला नाही. दादांच्या स्वभावातील ती भावलेली गोष्ट मी कधीच विसरणार नाही.’



Source link