Cyclone Midhila | बंगालच्या उपसागरात ‘मिधिला’ चक्रीवादळाचं सकटं, ‘या’ दोन राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
Cyclone Midhila | बंगालच्या उपसागरात ‘मिधिला’ चक्रीवादळाचं सकटं, ‘या’ दोन राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा! | Navarashtra (नवराष्ट्र)


बंगालच्या उपसागरात ‘मिधिला’ चक्रीवादळाचं सकटं, ‘या’ दोन राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा!

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र उग्र रूप धारण करत आहे. हवामान खात्याने पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र चक्रीवादळाचे रूप धारण करत आहे. या चक्रीवादळाला ‘मिधिली’ (Cyclone Midhila) असे नाव देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारपर्यंत बांगलादेशच्या किनारपट्टीवरून पुढे जाऊ शकते. हवामान खात्याने पश्चिम बंगाल (west bangal) आणि ओडिशामध्ये (odisha) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय शुक्रवारी त्रिपुरा आणि मिझोराममध्येही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. हवामान खात्यानुसार, ताशी 40 ते 70 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.

हे सुद्धा वाचा

‘या’ राज्यांमध्येही चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येईल

नागालँड, मणिपूर, आसाम आणि मेघालयमध्ये शनिवारपर्यंत पाऊस पडेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मिधिली चक्रीवादळ येत्या २४ तासांत तीव्र स्वरूप धारण करू शकते. हे चक्रीवादळ मोंग्ला आणि खेपाडा दरम्यान जाईल. हवामान बुलेटिननुसार हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडून वायव्येकडे सरकून वादळाचे रूप धारण करेल. तो शनिवारी सकाळी बांगलादेशच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो. येथे वाऱ्याचा वेग ताशी 75 किलोमीटरपर्यंत असू शकतो.






Source link