Saturday, November 7, 2026
Homeदेश-विदेशCyclone Dana : दाना चक्रीवादळाचा ओडिशात धिंगाणा; झाडे उन्मळून पडली, घरांचे नुकसान

Cyclone Dana : दाना चक्रीवादळाचा ओडिशात धिंगाणा; झाडे उन्मळून पडली, घरांचे नुकसान

[ad_1]

Cyclone Dana : ओडिशामध्ये दाना चक्रीवादळाचा कहर सुरू झाला आहे. भद्रक जिल्ह्यात जोरदार वारे वाहत असून बांसडा येथे मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी पहाटे चक्रीवादळाचा तडाखा सुरूच राहिल्याने अनेक झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशात सध्या ताशी १०० ते ११० ते १२० किमी वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले आहे. तर अनेक उड्डाणे रद्द करून काही उड्डाणे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रशासाने दिली आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments