Cristiano Ronaldo Turns 39: फुटबॉल विश्वातील स्टार आणि पोर्तुगालचा आयकॉन रोनाल्डो आज त्याचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. फुटबॉलच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद आणि युव्हेंटस येथे आपल्या दमदार खेळद्वारे अनेक अव्वल दर्जाच्या लीगचे विजेतेपद पटकावले. “मी विक्रमाचा पाठलाग करत नाही. तर, विक्रम माझ्या मागे लागतात,” असे ख्रिस्तियानो रोनाल्डोने यापूर्वी म्हटले आहे. रोनाल्डोच्या वाढदिवसानिमित्त त्याने रचलेल्या पाच विक्रमांवर एक नजर टाकुयात.








