Crime News | तोतया IPS अधिकारी बनून दीड वर्षे केली मौजमजा, एका सॅल्यूटने केली पोलखोल | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Crime News | तोतया IPS अधिकारी बनून दीड वर्षे केली मौजमजा, एका सॅल्यूटने केली पोलखोल | Navarashtra (नवराष्ट्र)


तोतया IPS अधिकारी बनून दीड वर्षे केली मौजमजा, एका सॅल्यूटने केली पोलखोल

समाजात प्रतिष्ठा वाढवण्यासाठी एका 24 वर्षीय तरुणाने आयपीएस अधिकारी (IPS officer) असल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उदयपूर: स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) देऊन अधिकारी होण्याची स्वप्ने आज लाखो तरुण तरुणी पाहत असतात. यासाठी अत्यंत जिद्दी व चिकाटीने रात्रं दिवस अभ्यास देखील करत असतात. मात्र काही लोक या स्वप्नांसाठी चूकीचा मार्ग (fruad case)निवडतात. अशी एक घटना समोर आली आहे. समाजात प्रतिष्ठा वाढवण्यासाठी एका 24 वर्षीय तरुणाने आयपीएस अधिकारी (IPS officer) असल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राजस्थान येथील बानसूर येथील तरुणाने समाजातील प्रतिष्ठा वाढावी यासाठी गेले दीड वर्षे आयपीएक अधिकारी असल्याचा बनाव रचला होता. आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितल्यामुळे गावामध्ये त्याला खूप मान सन्मान मिळू लागला. त्याचबरोबर त्याने साखरपुडा देखील केला होता.  मात्र त्याच्या एका छोट्या चुकीमुळे तो पकडला गेला आणि उदयपूर पोलिसांनी या बनावट आयपीएसला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.






Source link