भोकरदन मध्ये काँग्रेसची ताकद वाढली. राजाभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित व्यापारी जहीर शेठ कुरेशी यांचा काँग्रेस प्रवेश.

0
27
भोकरदन मध्ये काँग्रेसची ताकद वाढली. राजाभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित व्यापारी जहीर शेठ कुरेशी यांचा काँग्रेस प्रवेश.

जालना : भोकरदन मध्ये निवडणुकीची रणधुमाळी उठली आहे. नगरपरिषदेच्या अनुषंगाने पार पडली जाणाऱ्या निवडणुकांच्या बाबतीत अनेक तर्क वितर्क लावले जात असताना, लोकांमधून वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच गेली अनेक वर्ष काँग्रेसचे नेते आणि माजी भोकरदनचे माजी नगराध्यक्ष असलेले राजाभाऊ देशमुख यांच्या उपस्थित भोकरदन मधील प्रतिष्ठित व्यापारी जहीर शेठ कुरेशी यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने भोकरदन मधील काँग्रेसचे हात अजून बळकट झाल्याचे बोलले जात आहे.

जहीर शेठ कुरेशी यांच्या सोबतच उपाध्यक्ष इरफान सिद्दिकी, अजीम शेठ, एजास पठाण, रिजवान मामू, रईस पैलवान, नासेर शहा, तसेच अमेर शेख, अजमत कुरेशी, साजिद शेख, फेरोज कुरेशी, रहीम कुरेशी, आशलम शेख, शारूक शेख, हापीज कुरेशी, मुजीत कुरेशी, इरफान कुरेशी, समीर पैलवान सह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद अजून वाढल्याची चर्चा जनमानसात होताना दिसत आहे.

भोकरदन नरपरिषदेची ही निवडणूक ही भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे विरुद्ध राजाभाऊ देशमुख अशी मानली जाते.मात्र रोज काँग्रेस मध्ये होणारे जाहीर प्रवेश काँग्रेसला विजयाच्या दिशेने घेऊन जात असल्याचे बोलले जात आहे.