
Coldplay Chris Martin Viral Video : ब्रिटीश रॉक बँड ‘कोल्डप्ले’ने भारतात आपला ‘म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर’ सुरू केला आहे. परदेशाव्यतिरिक्त भारतातही कोल्डप्लेची क्रेझ प्रचंड आहे. या कॉन्सर्टची तिकिटे ऑनलाइन आल्यानंतर काही मिनिटांतच विकली गेली. यावरूनच तुम्ही या गायकाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता. या म्युझिक टूरची पहिली मैफल काल संध्याकाळी झाली आणि त्याची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉन्सर्टमधून काही व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत.







