Chhaava Teaser: विकी कौशलच्या ‘छावा’चा टीझर पाहून कतरिना कैफलाही भरली धडकी! नवऱ्याचं कौतुक करत म्हणाली…

0
1
Chhaava Teaser: विकी कौशलच्या ‘छावा’चा टीझर पाहून कतरिना कैफलाही भरली धडकी! नवऱ्याचं कौतुक करत म्हणाली…


कसा आहे चित्रपटाचा टीझर?

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर, अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि अक्षय खन्ना हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या १ मिनिट १४ सेकंदाच्या टीझरची सुरुवात विकी कौशलच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेने होते. टीझरच्या सुरुवातीला पार्श्वभूमीतून विकीचा आवाज येतो, ज्यामध्ये तो म्हणतो की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांना सिंह आणि सिंहाच्या मुलाला ‘छावा’ म्हणतात.’ यानंतर, शूर संभाजी महाराजांची कहाणी सुरू होते, जिथे सिंहासारखी गर्जना करणारा विकी एकाच वेळी समोरील सगळ्या शत्रूंवर हल्ला करतो.



Source link