
या परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांना जंगलात जाण्यास बंदी आहे. तरीही लोक लाकडे आणण्यासाठी जंगलात जात असतात. वनविभागाद्वारे कॅमेरा ट्रॅप लावून या भागातील वाघाच्या हालचालींची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे






