
चंद्रपूर जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या एकाच कुटूंबातील तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव येथे ही घटना घडली. तीन तरुण अस्थी विसर्जन करण्यासाठी नदीत उतरले होते, त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.






