Monday, August 31, 2026
Homeसाताराभिवंडी येथील अल्पवयीन संकेत भोसले हत्या प्रकरणी फलटण बंदचे आवाहन

भिवंडी येथील अल्पवयीन संकेत भोसले हत्या प्रकरणी फलटण बंदचे आवाहन

भिवंडी जि. ठाणे येथील दलित समाजातील अल्पवयीन युवक संकेत भोसले याची शुल्लक कारणावरून निघृण हत्या केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण दलित समाज पेठून येथून उठला आहे. कॉलेज मधील किरकोळ वादातून हे हत्याकांड झाले आहे. संकेत भोसले या युवकास अपहरण करीत गंभीर मारहाण झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या हप्ते प्रकरणातील सर्व आरोपीना कडक शासन झाले पाहिजे व संकेत भोसले यास न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी विविध दलित समाज संघटनेकडून होत आहे. या अमानवी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण फलटण शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

तरी या दिवशी फलटण शहरातून सकाळी 10 वाजता शांततापूर्ण मोर्चाने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. सदर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मंगळवार पेठ फलटण येथून निघणार आहे. तरी फलटण शहर व तालुक्यातील दलित बांधवांसह विविध सामाजिक संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होत मोर्चास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भिवंडी येथील अल्पवयीन संकेत भोसले हत्या प्रकरणी फलटण बंदचे आवाहन

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments