
हा प्रकार कोणाला सांगितल्यास आरोपींनी डॉक्टरांच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. डॉक्टरचे कपडे काढून अश्लील व्हिडीओ बनवून त्यांच्याकडून २० लाखाच्या खंडणीपैकी साडे आठ लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकाराने भयभीत झालेल्या डॉक्टरांनी पोलीस ठाणे गाठून आठ जणांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांनी आठ जणांपैकी पाच जणांना टक केली असून इतर आरोपींच्या शोधात तीन पथके रवाना केली आहेत. शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरला खंडणीसाठी धमकवण्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.





