
अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, देशमुख परिवारातील ८ सदस्य देऊळगाव राजा येथून हळदीच्या समारंभासाठी स्कॉर्पिओ वाहनाने जात होते. दगडवाडी नजीक भरधाव वेगातील वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याकडेला पलटले. यामुळे वाहन रस्त्याखाली गेले. यातील तिघेजण जागीच ठार झाले तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्याला जालना येथे तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.





