
बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर ३२ प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसला भीषण आग लागली. या आगीत जवळपास २५ प्रवासांचा होरपळून मृत्यू झाला. तर, ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणा येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती बुलढाण्याचे एसपी सुनील कडासणे यांनी दिली.






