Budget 2024: मोबाईलपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत, काय होणार स्वस्त? जाणून घ्या

0
12
Budget 2024: मोबाईलपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत, काय होणार स्वस्त? जाणून घ्या


Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. शेतकरी, तरुण, व्यावसायिक यांना या बजेडकडून खूप अपेक्षा आहे. दरम्यान अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलचा अर्थमंत्री निर्मला सितारमण बिहार, आंध्र प्रदेश राज्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत मांडण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. यंदाही सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. रोजगार, शेती, त्याचबरोबर उद्योग याक्षेत्रांसाठी घोषणा जाहीर केल्या आहेत.दरम्यान अर्थसंकल्पातून देशातील सर्वसामान्य नागरिकांना काय मिळणार? कोणत्या वस्तू स्वस्त होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. याबद्दल जाणून घेऊया.

काय स्वस्त होणार?

मोबाईल फोन, चार्जर स्वस्त होणार आहेत. मोबाईल, चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार आहेत.

सोनं चांदी स्वस्त होण्याची शक्यता 

चप्पल, शूज, कपडे स्वस्त होणार 

लिथियम बॅटरी स्वस्त होणार आहेत. यामुळे इलेक्ट्रिक कार्सदेखील स्वस्त होणार आहेत. 

मोबाईलचे पार्ट्स स्वस्त होणार आहेत. 

इंपोर्टेड ज्वेलरी स्वस्त होणार, एक्स रे मशीन स्वस्त होणार तर प्लास्टिकच्या वस्तू महागणार

काय होणार महाग?

प्लास्टिकच्या वस्तू महाग होणार आहेत.





Source link