
पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर भाष्य केल्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांना निलंबित केल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत मात्र, पण तथ्य तपासणीत ही बातमी खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासुन लक्षद्वीप प्रकरण (Lakshdweep) चांगलच गाजतयं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौऱ्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या मंत्र्यानी सध्या केलेली पोस्ट चर्चेत आहे. भारतविरोधी सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी बातमी सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तथ्य तपासणीत ही माहिती खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे. मालदीवचे उपमंत्री हसन जिहान यांनी स्वतःच्या निलंबनाचे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा
नेमकं प्रकरण काय?
मालदीव सरकारने सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर भारताबद्दल अपमानास्पद पोस्ट्सबाबत भारत सरकारच्या भूमिकेवर आपले विधान जारी केले आहे. भारत आणि पंतप्रधानांविरोधातील वक्तव्यानंतर मालदीवमध्ये जाणाऱ्या मोठ्या संख्येने भारतीय पर्यटकांनी आपले दौरे रद्द केले असल्याचे सांगण्यात येत आहे.









