BJP Mission 2024 | मंत्र्यांकडून मागवले ‘रिपोर्ट कार्ड’च, योजनांच्या लाभार्थींचीही मागितली माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
BJP Mission 2024 | मंत्र्यांकडून मागवले ‘रिपोर्ट कार्ड’च, योजनांच्या लाभार्थींचीही मागितली माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)


मंत्र्यांकडून मागवले ‘रिपोर्ट कार्ड’च, योजनांच्या लाभार्थींचीही मागितली माहिती

यंदा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) धामधूम सुरू असतानाच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत (Loksabha Election) राजकीय पक्षांमध्ये गदारोळ सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे.

नवी दिल्ली : यंदा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) धामधूम सुरू असतानाच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत (Loksabha Election) राजकीय पक्षांमध्ये गदारोळ सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे.

पाच महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने आपल्या सर्व मंत्र्यांच्या कामाचा तपशील मागवला आहे. सरकारच्या वतीने, मंत्र्यांना जनतेशी संबंधित त्यांच्या मंत्रालयांच्या योजना आणि उपलब्धींची संपूर्ण माहिती पाठविण्यास सांगितले आहे.






Source link