Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशBJP Leader Murder | नक्षलवाद्यांकडून भाजप नेत्याची गळा चिरून हत्या; खून करून...

BJP Leader Murder | नक्षलवाद्यांकडून भाजप नेत्याची गळा चिरून हत्या; खून करून पत्रकही फेकलं | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

छत्तीसगडमधील कांकेरमध्ये झालेल्या मोठ्या चकमकनंतर नक्षलवाद्यांमध्ये दहशत पसरली आहे. नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी भाजपा नेत्याची गळा चिरून हत्या केली. पंचमदास माणिकपुरी असे हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे.

रायपूर : छत्तीसगडमधील कांकेरमध्ये झालेल्या मोठ्या चकमकनंतर नक्षलवाद्यांमध्ये दहशत पसरली आहे. नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी भाजपा नेत्याची गळा चिरून हत्या केली. पंचमदास माणिकपुरी (Panchamdas Manikpuri) असे हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. हे प्रकरण नारायणपूरच्या फरासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दंडवंद गावातील आहे.

भाजप नेत्याच्या हत्येनंतर नक्षलवाद्यांनी एक पत्रकही फेकले, ज्यामध्ये भाजप नेत्यावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार इशारा देऊनही त्यांनी ऐकले नसल्याने त्यांना फाशीवर लटकविण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. कांकेरमध्ये मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. 2024 च्या सुरुवातीपासून, माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत 80 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. अलीकडच्या काळात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधातील रणनीती बदलली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments