
Bihar Politics : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सर्व प्रमुख पक्ष व आघाड्या कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, बैठका, आघाडी किंवा युतीच्या चर्चा अशा सर्व वातावरणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची कोणतीही संधी सत्ताधारी वा विरोधक सोडताना दिसत नाहीयेत. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. लवकरच नेतृत्वबदल होणार असल्याचे सूतोवाच भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी केले आहेत.
नितीश कुमार यांचं नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत









