Bilkis Bano Case | सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारचा झटका, बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी रद्द केली सरकारची माफी; दोषींना पुन्हा तुरुंगात जावं लागणार! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Bilkis Bano Case | सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारचा झटका, बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी रद्द केली सरकारची माफी; दोषींना पुन्हा तुरुंगात जावं लागणार! | Navarashtra (नवराष्ट्र)


bilkis bano

सर्वोच्च न्यायालयानं बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेला मंजूरी देणारा निकाल रद्द केला आहे. २००२ मध्ये गुजरात दंगलीत बिल्किस आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अमानुष छळ करण्यात आला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणी (Bilkis Bano Case) मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील दोषींच्या सुटकेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. न्यायाधीश बी.व्ही. नागरथना आणि उज्ज्वल भुयान खंडपीठांन हा निर्णय दिला आहे. सर्व 11 आरोपींचा सुटका आदेशही न्यायालयाने रद्द केला आहे.

हे सुद्धा वाचा

बिल्किस प्रकरणातील 11 दोषींची झाली होती सुटका

ऑगस्ट 2022 मध्ये, गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिल्किसच्या दोषींना तुरुंगात जावे लागणार आहे.






Source link