Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi : 'हापशीवर होणाऱ्या भांडणापेक्षा हे बेकार', अभिनेत्याची सूरजला पाठिंबा...

Bigg Boss Marathi : ‘हापशीवर होणाऱ्या भांडणापेक्षा हे बेकार’, अभिनेत्याची सूरजला पाठिंबा देत नवी पोस्ट

[ad_1]

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सूरज चव्हाणला पाठिंबा दिला आहे. तसेच सूरजला मिळणारी वागणूक पाहून संताप व्यक्त केला आहे. “दोन्ही वेळेची भांडी, साफसफाई, चपला ज्या त्याच्या नाहीत तरीही सूरजने का करावं? सूरज सारखा काहीच होऊ शकत नाही (जे समाजवेगळे दिसतात, वागतात, बोलतात अशा सगळ्याना बोलणारे ९०%) तो या शो मध्ये या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतोय. तरीही सगळ्यांना आपला गेम खेळायचा आहे. पण तो सगळं बघून घाबरलाय. हापशीवर (हँडपंप) होणाऱ्या भांडणापेक्षा हे लय बेकार आहे आणि एवढे सुंदर दिसणारे लोक असे का वागत असतील? कदाचित यात तो अडकलाय. बाकी लोकं, भांडी घासता येत नाही म्हणून रडणारे आणि जरी तुझे जोडे नसतील तर ते बाजूला ठेव सांगणारे आणि माझे नाहीत मी नाही उचलणार म्हटल्यावर सूरजवर चढ चढ चढतात! बाकी जातीवाद, वर्णवाद आणि वर्गवाद, सहानुभूती यावर मी बोलू शकत नाही. एवढी माझी समज नाही” असे त्याने म्हटले आहे.
वाचा: ‘तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते’, उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments