Bigg Boss Marathi: कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने निक्की तांबोळीला हाणलं! ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात नवा राडा

0
1
Bigg Boss Marathi: कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने निक्की तांबोळीला हाणलं! ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात नवा राडा


Bigg Boss Marathi5 Latest Update: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात रोजच नवीन राडे पाहायला मिळत आहेत. या खेळात सहभागी झालेले स्पर्धक आता एकमेकांसोबत मारामारी करताना देखील दिसणार आहेत. या घरात होणारी भांडण, वादविवाद, हाणामारी यामुळे नेहमीच हा शो चर्चेत असतो. आता या नव्या सीझनमध्ये देखील अशीच क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक नवीन चेहरे या खेळात उतरलेले दिसत आहेत. १६स्पर्धकांपैकी काही जणांना हा खेळ सोडून घरी परतावे लागले. तर, काही मात्र अजूनही हा खेळ अतिशय जोमाने खेळताना दिसत आहेत. नुकतीच या घरात एक वाईल्ड कार्ड एन्ट्री देखील झाली आहे. आज घरात कॅप्टन्सीसाठी नवा टास्क होताना दिसणार आहे. तर, या कॅप्टन्सी टास्कमध्ये पुन्हा एकदा नक्की तांबोळीची लुडबुड पाहायला मिळणार आहे.



Source link